ब्रेकिंग न्यूज

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास किंवा अशी पाटी लावल्यास होणार कारवाई

पुणे- पोलीस लिहिलेल्या किंवा तशी पाटी लावलेल्या खासगी वाहनांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत. ‘पोलीस’ अशा नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनातुन बरेचवेळा अवैध काम व दहशत निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे…

Read More

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू; वाकड-डांगे चौक रस्त्यावरील घटना

पिंपरी- सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेल कर्मचाऱ्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना वाकड-डांगे चौक रस्ता येथील ‘नवी दिल्ली बिर्याणी हाउस’मध्ये रविवारी रात्री घडली. या घटनेत अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शहजाद शेख (वय १९ रा. उत्तरप्रदेश ) असे या आगीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिलिंडर बदलताना गॅस गळती…

Read More

स्मशानात मृतदेह ठेवला आणि सगळे ग्रामस्थ पळाले… आंबेगाव तालुक्यात अचानक काय घडलं?

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत शोकाकूल प्रसंगी अचानक ग्रामस्थांनी मृतदेह खाली सोडून पळ काढला. अत्यंत संवेदनशील वेळी नेमकं काय घडलं? याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पीर येथील स्थानिक स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं…

Read More

संदीप वाघेरे युवा मंचतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी – संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश शिंदे, स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे, नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे, नगरसेवक विकास साने, माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत…

Read More

…..तर मी राजकारणातून निवृत्त होईन ; राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असे का म्हणाले ? व्हिडिओ पाहा

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. आंबेगाव तालुक्यात एका नामांकित कंपनीत एफडीएच्या धाडीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. या कारवाईनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप…

Read More

हडपसरमध्ये संगणक अभियंत्याची आत्महत्या ; १५ व्या मजल्यावरून मारली उडी

पुणे- हडपसर भागात एका ३३ वर्षीय संगणक अभियंत्याने १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल (पूर्ण नाव समजले नाही )(वय ३३ वर्षे), हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा गावचा रहिवासी…

Read More

पुणे आरटीओ चे जिल्ह्यात ७ दिवसांचे विशेष शिबिर, आजच अपॉइंटमेंट घ्या

पुणे – ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे किंवा इतर RTO ची कामे करायची आहेत त्यांच्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात 7 ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  ऑगस्ट 2026 मध्ये खालील 7 ठिकाणी 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शिबिर भरवले जाणार आहे. भोर सासवड उरुळीकांचन पिरंगुट जेजुरी शिक्रापूर शिरूर या शिबिरात नवीन पक्की…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा, मारुती भापकर यांची मागणी 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत पुतळा बसवावा अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.  या बाबतचे पत्र त्यांनी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांना दिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती…

Read More

भामट्याची अनोखी शक्कल, दिघीमधील सोनाराला असा घातला ६.२९ लाखांचा गंडा 

दिघी- दागिने बनवून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम एनईएफटीद्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवत एका सोनाराची ६ लाख २९ हजार ७८० रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दिघीतील सावंतनगर येथील कृष्णा सिल्वर वर्कशॉपमध्ये घडला. याप्रकरणी निलेश बाळकृष्ण जाधव (वय ४६, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक आनंद हातकामकर (वय ३६, रा. पोलादपूर, महाड, जि. रायगड)…

Read More

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी रांजणगाव – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत…

Read More