ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डीपीवरील हरकतींवर या दिवशी आणि या ठिकाणी होणार सुनावणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींवर ३ ऑगस्ट पासून सुनावणी सुरु होणार आहे. आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात ही सुनावणी होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने सुधारित प्रारूप विकास योजना आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या….

Read More

बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा  ट्रेलर प्रदर्शित

‎‎दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या महाकाय चित्रपटाच्या पहिल्या भागाचा अधिकृत ट्रेलर नुकताच 30 जुलै रोजी पहाटे 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‎‎​दोन भागांमध्ये…

Read More

पुण्यात भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट…

Read More

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली- मोदी सरकारकडून आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली आहे. देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. नुकताच राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचे…

Read More

पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

पिंपरी- शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, ग्राहकसंख्या आणि विजेची मागणी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. वीज विषयक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी महापारेषण आणि महावितरणला कालबद्ध, परिणामकारक आणि भविष्यवेधी नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. महावितरण ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शुक्रवार (दि…

Read More

मतदार तपासणी मोहिमेला मुदतवाढ, या तारखेपर्यंत भरता येणार एन्युमरेशन फॉर्म

पुणे- मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेली संधी आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे. निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील प्रारूप (ड्राफ्ट) मतदार याद्या…

Read More

किरकोळ कारणावरून केला मित्राचा खून, आरोपीचा देखील झाला मृत्यू

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये, शिंदे गाव (ता. खेड) येथे घडली. चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. अमरूष उरानो…

Read More

पीएमपीएमएल बसमधून फक्त ५०० रुपयात घ्या ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद

पुणे- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीचा आनंद घेत आहेत. पुणेकर पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. फक्त ५०० रुपयांमध्ये पुणेकरांना मुळशी, ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने त्यासाठी एका विशेष बसचे नियोजन केले आहे. पीएमपीने ९ अ हा नवीन जलद मार्ग सुरु केला आहे. या नवीन विशेष बसचा…

Read More

कुदळवाडीतील विष्णु ग्रीन्स परिसर १५ दिवसात होणार कचरामुक्त ; महापौर रवी लांडगे यांचे आश्वासन

पिंपरी- कुदळवाडी परिसरातील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा साचण्याची समस्या तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने निर्माण होणारी अस्वच्छता, वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगाराला आग लावून होणारे वायू…

Read More

गिरीश प्रभुणे यांना सोलापूर विद्यापीठाकडून सन्माननीय ‘डि.लिट’ प्रदान

सोलापूर- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आज, गुरुवारी ‘डि.लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल मा राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी,…

Read More