पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो
पुणे – मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत आहेत. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे…
संदीप वाघेरे युवा मंचाचा दहीहंडी उत्सव ; चेंबूरच्या शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली दहीहंडी
पिंपरी – श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ शनिवारी (दि. ५ ) पिंपरीगाव येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चेंबूर येथील शितळादेवी गोविंदा पथकाने तब्बल सहा थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सोहळ्याला परिसरातील हजारो नागरिक, तरुणाई आणि गोविंदा पथकांनी मोठ्या…
अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई
पिंपरी- अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. पोलिसांच्या प्रस्तावावर संबंधित प्राधिकरणाने २ सप्टेंबर रोजी आदेश कायम केला. पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगवी पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये दाखल झालेल्या अमली पदार्थ प्रकरणाशी संबंधित आहे….
श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही
भीमाशंकर- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची पाहणी करुन बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला. नवीन आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या निगडाळे परिसरातील वाहनतळ, बसस्थानक, विविध नागरी सुविधा आणि भक्तनिवास याबाबत…
सांगवीमध्ये दहीहंडी उत्सवानंतर लोखंडी सांगाड्याचा भाग अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
पिंपरी- सांगवीतील शिंदेनगर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ दहीहंडी उत्सवानंतर स्टेजचे डेकोरेशन उतरवत असताना लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक कोसळला. या घटनेत एका ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे या दुर्दैवी…
मुलीच्या आवाजात कॉल करून ‘क्रिप्टोकरन्सी’द्वारे तरुणाला दीड लाखाला गंडा, तरुणाला अटक
पुणे- प्रिन्सिका जोशी नावाने मुलीच्या आवाजात कॉल करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल दीड लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार तब्बल सात महिने सुरु होता. कुणाल जितेंद्र अदमाने (वय-२५, रा. पर्वती परिसर) असे या…
पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन, गणेश कला-क्रीडा रंगमंचावर रंगणार सोहळा
पुणे – कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुण्यात रंगणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार…
मशागतीचे काम करत असताना शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू, उरळी कांचन मधील दुर्दैवी घटना
पुणे- शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वळती, ता. हवेली येथे घडली आहे. सोपान केरू कुंजीर (वय-५६ वर्ष, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ०४) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात…
मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
मुंबई- मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांच्यावर पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्याच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना मध्यरात्री जारी करण्यात आली आहे. सोमवारी सभागृहात त्यांच्या पदमुक्तीची कायदेशीर घोषणा केली जाणार आहे. पालघर जिल्हा जात…
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात, १ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगवी मधील आनंदनगर स्विमिंग टॅंक रस्त्यावर गुरुवारी (दि. ३) दुपारी ही कारवाई करण्यात आली. उमेश सुबराव कुटे (वय ३७ नेवाळे वस्ती, चिखली) असे या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी ५९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार…
