ब्रेकिंग न्यूज

पुणे आरटीओ चे जिल्ह्यात ७ दिवसांचे विशेष शिबिर, आजच अपॉइंटमेंट घ्या

Share

पुणे – ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे किंवा इतर RTO ची कामे करायची आहेत त्यांच्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात 7 ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

ऑगस्ट 2026 मध्ये खालील 7 ठिकाणी 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शिबिर भरवले जाणार आहे.

भोर

सासवड

उरुळीकांचन

पिरंगुट

जेजुरी

शिक्रापूर

शिरूर

या शिबिरात नवीन पक्की ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी घेतली जाईल. त्याचबरोबर लर्निंग लायसन्स, पत्ता बदल, डुप्लिकेट RC यासारखी इतर परिवहन विषयक कामे देखील करता येतील.

अपॉइंटमेंट कधीपासून?

महिन्यातील सर्व शिबिरांसाठी अपॉइंटमेंट बुकिंग 30 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू झालेली आहे.

नागरिकांनी काय करावे?

1. अपॉइंटमेंटशिवाय प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे आधी ऑनलाइन स्लॉट बुक करा.

2. RTO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला सोयीचे गाव आणि तारीख निवडा.

3. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दिलेल्या तारखेला सर्व आवश्यक कागदपत्रांसह शिबिराच्या ठिकाणी वेळेवर हजर रहा.

गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेत काम होण्यासाठी लवकरात लवकर अपॉइंटमेंट बुक करा. आता RTO ची कामे करण्यासाठी पुणे शहरात जाण्याची गरज नाही. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.