ब्रेकिंग न्यूज

मुलीच्या आवाजात कॉल करून ‘क्रिप्टोकरन्सी’द्वारे तरुणाला दीड लाखाला गंडा, तरुणाला अटक

पुणे- प्रिन्सिका जोशी नावाने मुलीच्या आवाजात कॉल करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल दीड लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार तब्बल सात महिने सुरु होता. कुणाल जितेंद्र अदमाने (वय-२५, रा. पर्वती परिसर) असे या…

Read More

पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन, गणेश कला-क्रीडा रंगमंचावर रंगणार सोहळा

पुणे – कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि क्रीडा यांचा संगम असणारा ३८ वा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुण्यात रंगणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार…

Read More

मशागतीचे काम करत असताना शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू, उरळी कांचन मधील दुर्दैवी घटना

पुणे- शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वळती, ता. हवेली येथे घडली आहे. सोपान केरू कुंजीर (वय-५६ वर्ष, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ०४) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात…

Read More

बारामतीत महाविद्यालयीन तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बारामती- मागील महिन्यात बारामती शहरात एका अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली असतानाच १६ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने बारामती शहर पुन्हा हादरून गेले आहे. शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. प्रज्ञा सुनील शिंदे (वय १६ वर्षे)…

Read More

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा

पुणे- विद्यानंद बापट यांना गुरुवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि ‘डीजे’च्या मुक्तीसाठी पुणेकरांनी येत्या रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्यापासून महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात डीजे विरोधात पुणेकरांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यानंद बापट आपली आग्रही भूमिका…

Read More

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन गाड्यांची तोडफोड

पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या बी टी कवडे रस्ता भागातील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्यांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय नेत्याच्या घराबाहेरच असा प्रकार घडल्याने पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड परिसरात असलेल्या…

Read More

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण सर्वसामान्य कार्यकर्ता नाही, तर तो आहे…

पुणे- विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासात अटक केली आहे. मारहाण करणारा संतोष चव्हाण हा सर्वसामान्य कार्यकर्ता नसून तो एक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील राऊतवाडी भागातील रहिवासी आहे. बी.कॉम झालेला संतोष चव्हाण हा टिंबर मार्केटमधील एका छोट्या इलेक्ट्रिक दुकानात नोकरी करतो….

Read More

आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

पुणे – धायरी परिसरातील मुठा कालव्याशेजारी असलेल्या पिनाक आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत धातूचे साहित्य तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. आकाश बाळू ननावरे (वय ३२, रा. दत्तवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी स्वतंत्र तपास पथक नेमले…

Read More

विद्यानंद बापट यांना मारहाण ; माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी केला हल्ला

पुणे- गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सवात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी अशी मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर विद्यानंद बापट हे नाव घराघरात पोचले आहे. याच विषयावर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. या मुद्द्यावर पुण्यातील…

Read More

विद्यानंद बापट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, निवृत्त पुणेकर प्राध्यापक पोलिसात तक्रार देणार

पुणे- गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात आवाज उठवणाऱ्या पुण्यातील विद्यानंद बापट हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बापट हे सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मागणीला पुणेकरांनी देखील समर्थन दिले आहे. परंतु कोथरूड येथे राहणारे निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आणि सदाशिव पेठेत राहणाऱ्या शशांक महाजन यांनी बापट यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.धनंजय कुलकर्णी…

Read More