ब्रेकिंग न्यूज

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा- सिध्दार्थ जाधव

पिंपरी- जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सुप्रसिध्द मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तरूणाईला दिला. चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या…

Read More

‘फटाका सायलेंसर’चा फटका ; पोलिसांकडून १८ तरुणांची धिंड आणि उठाबशा

पुणे- मध्यरात्री ‘फटाका सायलेंसर’ लावून धुमाकूळ घालणाऱ्या बुलेट गँगविरुद्ध पुणे पोलिसांनी अत्यंत कडक मोहीम उघडली आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल करून हुल्लडबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बुलेटसह एकूण ११ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ जुलै २०२६ च्या मध्यरात्री ते १ ऑगस्ट २०२६ च्या पहाटेच्या दरम्यान उंड्री, महंमदवाडी,…

Read More

दारू मिळणार नाही ! मद्याच्या ‘या’ प्रसिद्ध ब्रॅण्डवर घालण्यात आली बंदी

मुंबई- मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न सुरक्षा नियामक एफएसएसआयने ओल्ड मॉन्क, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मद्यामध्ये नैसर्गिक प्रक्रियेला बगल देऊन कृत्रिम फ्लेवर्स  मिसळल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे…

Read More

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास किंवा अशी पाटी लावल्यास होणार कारवाई

पुणे- पोलीस लिहिलेल्या किंवा तशी पाटी लावलेल्या खासगी वाहनांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत. ‘पोलीस’ अशा नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनातुन बरेचवेळा अवैध काम व दहशत निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे…

Read More

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू; वाकड-डांगे चौक रस्त्यावरील घटना

पिंपरी- सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेल कर्मचाऱ्याचा भाजून मृत्यू झाला. ही घटना वाकड-डांगे चौक रस्ता येथील ‘नवी दिल्ली बिर्याणी हाउस’मध्ये रविवारी रात्री घडली. या घटनेत अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शहजाद शेख (वय १९ रा. उत्तरप्रदेश ) असे या आगीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिलिंडर बदलताना गॅस गळती…

Read More

स्मशानात मृतदेह ठेवला आणि सगळे ग्रामस्थ पळाले… आंबेगाव तालुक्यात अचानक काय घडलं?

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत शोकाकूल प्रसंगी अचानक ग्रामस्थांनी मृतदेह खाली सोडून पळ काढला. अत्यंत संवेदनशील वेळी नेमकं काय घडलं? याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पीर येथील स्थानिक स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं…

Read More

संदीप वाघेरे युवा मंचतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी – संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश शिंदे, स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे, नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे, नगरसेवक विकास साने, माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत…

Read More

…..तर मी राजकारणातून निवृत्त होईन ; राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असे का म्हणाले ? व्हिडिओ पाहा

मुंबई- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. आंबेगाव तालुक्यात एका नामांकित कंपनीत एफडीएच्या धाडीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. या कारवाईनंतर आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप…

Read More

हडपसरमध्ये संगणक अभियंत्याची आत्महत्या ; १५ व्या मजल्यावरून मारली उडी

पुणे- हडपसर भागात एका ३३ वर्षीय संगणक अभियंत्याने १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल (पूर्ण नाव समजले नाही )(वय ३३ वर्षे), हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा गावचा रहिवासी…

Read More

पुणे आरटीओ चे जिल्ह्यात ७ दिवसांचे विशेष शिबिर, आजच अपॉइंटमेंट घ्या

पुणे – ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे किंवा इतर RTO ची कामे करायची आहेत त्यांच्यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात 7 ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  ऑगस्ट 2026 मध्ये खालील 7 ठिकाणी 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शिबिर भरवले जाणार आहे. भोर सासवड उरुळीकांचन पिरंगुट जेजुरी शिक्रापूर शिरूर या शिबिरात नवीन पक्की…

Read More