ब्रेकिंग न्यूज

राममंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदावर माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड

अयोध्या- अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) घोषणा झालेली आहे. मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सांभाळण्यासाठी भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच तीन नव्या विश्वस्तांनाही ट्रस्टच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राममंदिरातील देणगी चोरीच्या आरोपांनंतर सरचिटणीस चंपत राय…

Read More

दिल्लीत इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनच्या ८ व्या वार्षिक अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा डंका

नवी दिल्ली- इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनचे (IFA) ८ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच( २८-२९ ऑगस्ट) दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला देशातील २४ राज्यांतील १०५ शहरांमधून २६३ फूल व्यावसायिक उपस्थित होते. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या फुल व्यावसायिकांनी विविध पुरस्कार पटकावून शहराचे नाव उंच केले आहे. या अधिवेशनासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातून सर्वाधिक सहभाग पाहायला मिळाला. महाराष्ट्रातून…

Read More

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला ! LPG गॅस, रिक्षा भाडे, दूध महागले, देशात होणार ५ मोठे बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक मोठे आर्थिक आणि व्यावहारिक बदल होत असतात. आगामी १ सप्टेंबर २०२६ पासून देशात ५ मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि बजेटवर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांपासून ते विमानतळावरील इमिग्रेशन नियमांपर्यंतच्या बदलांचा समावेश आहे. १ सप्टेंबरपासून नेमके काय बदलणार आहे ते बघूया. १. LPG सिलेंडरचे…

Read More

तुमच्या माहितीसाठी.. पिनकोडऐवजी आता लवकरच ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली येणार

नवी दिल्ली- भारतात आता पारंपरिक ६ अंकी पिनकोडऐवजी ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली आणण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत डाक विभाग या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे. डीजी पिन म्हणजे काय? हा एक डिजिटल भौगोलिक पत्ता असेल. यामुळे संपूर्ण देशातील कोणत्याही जागेचे नेमके लोकेशन शोधणे सोपे होईल. हा कोड अक्षांश-रेखांशवर आधारित असेल. याचे मुख्य…

Read More

आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी एअरहोस्टेस सह एकाला अटक

मुंबई- गुजरातच्या वडोदरा येथून मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअरहोस्टेसला तिच्या साथीदारासह सूरत क्राईम ब्रँचने अटक केली आहे. वडोदराहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. मानसी सय्यद (वय ४१) आणि सोहेल सुलेमान शेख (वय २०) अशी…

Read More

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस, एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

पुणे- मांजरी इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे. उपोषणाचा आज तेरावा दिवस असून एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्यामुळे ४ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील विविध सामाजिक संघटना,…

Read More

17 सप्टेंबरपासून भाजप राबवणार देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’

नवी दिल्ली – येत्या १७ सप्टेंबरपासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर देशव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. सेवेसाठी समर्पण मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पक्षाचे अभियान समर्पित सेवेभोवती केंद्रित…

Read More

शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी ऍक्शन मोडवर ! NTA परीक्षेच्या ६०० तज्ज्ञांना घरचा रस्ता

नवी दिल्ली- नवनियुक्त केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आपल्या परीक्षा पथकात मोठा फेरबदल करत ६०० परीक्षा तज्ज्ञांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या…

Read More

‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता नव्या पक्षाचा उदय..एका रात्रीत लाखाहून अधिक फॉलोअर्स

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘दिमागी नक्सल’ हा शब्दप्रयोग वापरला होता. आता याच शब्दाचा आधार घेत ‘दिमागी नक्सल’ नावाच्या नव्या ऑनलाईन पक्षाची स्थापना झाली आहे. पाहता पाहता एका रात्रीत या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजला १,८१,००० हून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित करताना…

Read More

लोणावळा रेल्वे स्थानकातील पाणी पिताय का ? सावधान ! देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक

नवी दिल्ली- मुंबईसह देशातील अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी दूषित आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकासहित देशातील ८ रेल्वे स्थानकातील पाणी आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) ने दिला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ समोर येत असताना रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या…

Read More