ब्रेकिंग न्यूज

पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

पुणे – मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत आहेत.  सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे…

Read More

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई 

पिंपरी- अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. पोलिसांच्या प्रस्तावावर संबंधित प्राधिकरणाने २ सप्टेंबर रोजी आदेश कायम केला.  पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांगवी पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये दाखल झालेल्या अमली पदार्थ प्रकरणाशी संबंधित आहे….

Read More

सांगवीमध्ये दहीहंडी उत्सवानंतर लोखंडी सांगाड्याचा भाग अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

पिंपरी- सांगवीतील शिंदेनगर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ दहीहंडी उत्सवानंतर स्टेजचे डेकोरेशन उतरवत असताना लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक कोसळला. या घटनेत एका ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे या दुर्दैवी…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात, १ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगवी मधील आनंदनगर स्विमिंग टॅंक रस्त्यावर गुरुवारी (दि. ३) दुपारी ही कारवाई करण्यात आली. उमेश सुबराव कुटे (वय ३७ नेवाळे वस्ती, चिखली) असे या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी ५९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार…

Read More

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात संपन्न

पिंपरी – मराठा सेवा संघ गेली छत्तीस वर्षे राष्ट्रमाता जिजाऊंना आदर्श मानून शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने कार्य करत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करत असताना मराठा समाजास न्याय मिळावा तसेच इतर समाजावर अन्याय होणार नाही व सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी पूर्वी प्रमाणेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय…

Read More

उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतची बैठक निष्फळ, हिंजवडी आयटी कर्मचारी रविवारी आंदोलन करणार

पुणे – हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांनी येत्या रविवारी (ता.६) आंदोलनाची हाक दिली आहे.  हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन हे प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेले नाहीत. याला वाचा फोडण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी येत्या…

Read More

लेझर, बीम लाईट वापरल्याप्रकरणी पहिला गुन्हा! सांगवीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाला १००० रु दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा 

पिंपरी – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदी घातलेल्या प्रखर लेझर आणि बीम लाईटचा वापर केल्या प्रकरणी सांगवी येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  बजरंग विनायक लकडे (वय ३४, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख) असे शिक्षा सुनावलेल्या मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. पिंपळे निलख येथील जय भवानी मित्र मंडळाचा…

Read More

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सदनिकाधारकांनी महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी घ्यावी

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी १ ऑक्टोबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे. एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू ; संदीप वाघेरेंच्या पाठपुराव्याला अखेर यश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वैधानिक बैठकींचे बंद करण्यात आलेले थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. आयुक्तांकडे लेखी मागणी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यानंतर वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली. या कायदेशीर लढ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णयावर पुनर्विचार करत…

Read More

तरुणाच्या अपहरणाचा कट उधळला ; समृद्धी महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीना केली अटक

पुणे- पुणे येथे राहणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गावर उघडकीस आला. चित्रपटात शोभेल असा तीन किमीपर्यंत पाठलाग करून महामार्ग पोलिसांनी मोटार अडवून आरोपीना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली. आरशद शकील अहमद सिद्दीकी (वय २४ वर्ष, रा. मोरे वजन काटयाजवळ मोरे पाटील चौक,…

Read More