ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेच्या १० विशेष फेऱ्या

Share

पुणे- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनाने पुणे-रत्नागिरी मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी

१५ आणि २२ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक ०१४४६ रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात दाखल होईल;

गाडी क्रमांक ०१४४७ पुणे-रत्नागिरी 

१२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता पुण्याहून सुटेल आणि सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ०१४४८ रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात येईल.

१५ स्थानकांवर थांबे

या विशेष गाड्यांना येता-जाता चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाड्यांसाठी नियमानुसार विशेष शुल्क लागू राहणार आहे.