पुणेकरांसाठी खुशखबर! गणेशोत्सवात दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो
पुणे – मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत आहेत. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे…
