ब्रेकिंग न्यूज

Vedh News

मोरवाडी आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्याची सौदी अरेबिया येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड 

पिंपरी – सन 2021- 23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याची सौदी अरेबिया मधील दमाम येथे जूनियर डिझायनर म्हणून निवड झाली.  हा प्रशिक्षणार्थी आयटीआय मध्ये प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम आला होता या निकषावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्राप्त झाली. नंतर याच कंपनीमध्ये ट्रेनि म्हणून निवड झाली. उत्कृष्ट कामकाज,…

Read More

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य, सोशल मीडिया इन्फ्लुएंजरच्या विरोधात गुन्हा

पुणे- उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी दोघा इन्फ्लुएंजरवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

तुमच्या माहितीसाठी.. पिनकोडऐवजी आता लवकरच ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली येणार

नवी दिल्ली- भारतात आता पारंपरिक ६ अंकी पिनकोडऐवजी ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली आणण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत डाक विभाग या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे. डीजी पिन म्हणजे काय? हा एक डिजिटल भौगोलिक पत्ता असेल. यामुळे संपूर्ण देशातील कोणत्याही जागेचे नेमके लोकेशन शोधणे सोपे होईल. हा कोड अक्षांश-रेखांशवर आधारित असेल. याचे मुख्य…

Read More

गायिका केतकी माटेगावकरकडून आर्थिक मदतीची विनंती ; कुणासाठी मागत आहे आर्थिक मदत ?

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पैशांची मदत मागितली आहे. गार्गी नावाच्या एका चिमुकलीला झालेल्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी केतकीने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिने सांगितलं की, “तिला एक दुर्मिळ असा आजार आहे, एसएमए टाइप 1 म्हणजेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रॉफी. यामध्ये आता तिला तिची मानही…

Read More

सहकारनगरमध्ये बेकायदा सावकारी करून कोट्यवधींची वसुली; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे – कोणताही सावकारीचा वैध परवाना नसताना नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सहकारनगर परिसरात विनापरवाना सावकारी करून फिर्यादीकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वसूल केल्या उघडकीस आले आहे. हा प्रकार २०१५ ते २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड….

Read More

गणेशोत्सवात पुणेकरांच्या छातीत धडकी नको, हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. डीजे, लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन यंदा या गोष्टींचा वापर पूर्णपणे टाळावा. गणेशोत्सवात पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी…

Read More

आता ओरिजिनल पैठणी ओळखता येणार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंची माहिती

सोलापूर – समस्त महिलांचा आवडता वस्त्र अलंकार म्हणजे पैठणी. सणसमारंभासाठी पैठणी परिधान करण्याची क्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते. पण अस्सल पैठणीच्या नावाने डुप्लिकेट पैठणी ग्राहकांच्या गळ्यात मारली जाते. आता ग्राहकांना ओरिजिनल पैठणी त्वरित ओळखता येणार आहे.  ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी यासाठी आता पैठणीवर एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यामुळे,…

Read More

पुण्यात संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातील वादातून उचलले टोकाचे पाऊल

पुणे – प्रियकरासोबत झालेल्या वादातून २३ वर्षीय संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.  जान्‍हवी पाठक (वय २३) असे या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली. याप्रकरणी…

Read More

रस्ता ओलांडणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा भरधाव कारच्या धडकेत करुण अंत, मुंबईच्या उच्चभ्रू परिसरातील घटना

मुंबई – एका भरधाव लक्झरी कारने एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानासमोर घडली. अंश गुप्ता (वय ८) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी इनोव्हा क्रिस्टा कार चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मेघा रावल असे…

Read More

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, मद्यधुंद चालकाला अटक 

शिरूर – मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडला. हा अपघात रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ शुक्रवारी (ता. २९) रात्री आठ वाजता घडला. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली. दीपक राजेश थोरात (वय २२, रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) असे…

Read More