शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई- राज्यात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धूम आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या असून २७ तारखेला याची मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
या पाचही मतदारसंघांमध्ये नेमकी कोणाकोणामध्ये लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. काही मतदारसंघामध्ये बंडखोरीदेखील झालेली आहे. त्यामुळे आता मतफुटीची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांना विजयाचे गणित साधावे लागणार आहे.
पुणे शिक्षक मतदार संघ
कौस्तुभ गावडे-भाजपा विरुद्ध जयंत आसगावकर-काँग्रेस
सचिन सानप-शिवसेना , दत्तात्रय सावंत-अपक्ष
अमरावती शिक्षक मतदार संघ
अदिती पोहरे-काँग्रेस, दत्तात्रय लहाने-ठाकरे गट
किरण सरनाईक-शिवसेना
दिलीप कडू- विदर्भ.माध्यमिक.शिक्षक संघ
श्रीकांत देशपांडे माजी आमदार -शिवसेना बंडखोर
शेखर भोयर- भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे (भाजप बंडखोर)
सुमित पवार- भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय (भाजप बंडखोर)
संगीता शिंदे- भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहिण (भाजप बंडखोर)
पुणे पदवीधर मतदार संघ
स्मिता जाधव-भाजप विरुद्ध हर्षदा देशमुख-जाधव- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सुनील मोदी-ठाकरे गट
नागपूर पदवीधर मतदार संघ
सुधाकर कोहळे -भाजप विरुद्ध अभिजीत वंजारी-काँग्रेस
राष्ट्रवादीचे नितेश कराळे-अपक्ष
संभाजीनगर पदवीधर मतदार संघ
सतीश चव्हाण-राष्ट्रवादी विरुद्ध दिलीप घुगे-ठाकरे गट
प्रतापसिंह पाटील-राष्ट्रवादी शरद पवार
पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वांत कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोग सज्ज
पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. पाचही मतदारसंघांत मिळून दोन हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
ही निवडणूक सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण सरस ठरणार तसेच कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






