उसाच्या शेतात आढळला दोन पोत्यात भरून ठेवलेला ३१ किलो गांजा

उसाच्या शेतात आढळला दोन पोत्यात भरून ठेवलेला ३१ किलो गांजा
Share

नारायणगाव – कांदळी येथील शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात अज्ञात व्यक्तीने दोन पोत्यात भरून ठेवलेला ३१ किलोग्रॅम गांजा नारायणगाव पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत १५ लाख ४९ हजार रुपये आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदळी येथील शेतकरी राहुल गाडगे यांच्या उसाच्या शेतात दोन पोत्यात भरून ठेवलेला गांजा आढळून आला.याबाबतची माहिती कांदळीचे पोलीस पाटील अरुण भालेराव यांनी आज सकाळी नारायणगाव पोलिसांना दिली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन नारायणगाव पोलिसांनी पंचनामा करून पोत्यातील गांजा जप्त केला. मात्र, राहुल गाडगे यांच्या शेतात गांजा आणून कोणी ठेवला? हे अद्याप पन निष्पन्न न झाल्याने नारायणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Vedh News