ब्रेकिंग न्यूज

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद ; या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे- महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, (दि. ३०) या केंद्राच्या अंतर्गत परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी, (दि. ३१) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी…

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील २ आरोपी आणि २ अल्पवयीन जेरबंद, गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

पुणे- शहरात गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजवणाऱ्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील २ फरार आरोपी आणि २ विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. सुजित सोमनाथ धुतावळे (वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द) आणि आशिष राजू सोनवणे (वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड) अशी…

Read More

दूध २ रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी वाढणार, मंगळवारपासून दरवाढ लागू

मुंबई- इंधनाच्या दरामध्ये वाढ, पॅकिंगच्या कच्च्यामालाच्या दरामध्ये वाढ तसेच साखरेचे भाव वाढल्यामुळे गे आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दारात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील खासगी, सहकारी दूध संघानी घेतला आहे. ही दरवाढ येत्या मंगळवार (दि. ११) पासून लागू होणार आहे. राज्यातील प्रमुख खासगी आणि सरकारी दूध संघांच्या सभासदांची बैठक आज, शुक्रवारी कात्रज डेअरी येथे झाली….

Read More

महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देताना महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य शासनाकडे पाठविला असून त्यास अद्यापदेखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील सर्व विभागातील एकूण ४ हजार ७८४…

Read More

इंद्रायणीनगर भोसरी येथे ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोमाता मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे सोमवारी (दिनांक १२ मे २०२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई, यासर्वांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले. भोसरी…

Read More

बारामतीत महाविद्यालयीन तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बारामती- मागील महिन्यात बारामती शहरात एका अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली असतानाच १६ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने बारामती शहर पुन्हा हादरून गेले आहे. शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. प्रज्ञा सुनील शिंदे (वय १६ वर्षे)…

Read More

ख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार -डॉ. सुलक्षणा शिलवंत

पिंपरी- ख्रिस्ती समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे यासाठी आपण भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी ख्रिस्ती बांधवांशी बोलताना व्यक्त केले. डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात ख्रिस्ती समाजाचे खूप मोठे…

Read More

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस, एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

पुणे- मांजरी इथल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे. उपोषणाचा आज तेरावा दिवस असून एका विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्यामुळे ४ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील विविध सामाजिक संघटना,…

Read More

तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव

मुंबई- अभिनेते राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता त्याच्या घरावरही संकट ओढावले आहे. बँकेने त्यांच्या वडिलोपार्जित घरावर जप्ती आणल्यामुळे राजपाल यादव यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्यांच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10…

Read More