पुणे- गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कात्रज चौक परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने सोमवारी (दि. १७) रोजी केली.
रोशन उर्फ सोन्या घोरपडे (वय २९ रा. वडगाव बुद्रुक ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिराडे यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी रोशन उर्फ सोन्या घोरपडे हा कात्रज चौक परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कात्रज चौकात सापळा लावला. तिथे एका इसमाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपले नाव रोशन उर्फ सोन्या मनोहर घोरपडे वर्ष असे सांगितले.
त्याला तातडीने अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, सह पोलीस आयुक्त गगनर हसन आणि अपर पोलीस आयुक्त राजेंद्र मुखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
