ब्रेकिंग न्यूज

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तरुणीचे अर्धनग्न फोटो मागणाऱ्या आध्यामिक गुरुला अटक

पुणे- फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली शरीरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्याचे आमिष दाखवून तरुणीकडे तिच्या अर्धनग्न फोटोची मागणी करणार्‍या तथाकथित आध्यामिक गुरुला कोंढवा पोलिसांनी अटक केली. दिव्य जितेंद्र परमार (वय २३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पनवेल येथील एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस…

Read More

ऑपरेशन सिंदूरचं देशभर कौतुक,पिंपरी चिंचवड मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन

पिंपरी प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद ,जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व भोसरी विधानसभा शहर प्रमुख श्री.संभाजी शिरसाट यांच्या…

Read More

अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

पुणे- हत्या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात त्यांची धिंड काढणे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना खूप महागात गेले आहे. या प्रकरणी मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटला…

Read More

भावडी गावची कन्या ऋतुजा मोरे पोलिस दलात दाखल

पिंपरी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात असलेल्या भावडी गावातील ऋतुजा बारकु मोरे हिने महाराष्ट्र पोलिस दलात पुणे शहर पोलिस पदावर निवड मिळवत गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. भावडी गावातून पोलिस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून,तिच्या या यशामुळे सातगाव पठार परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही …

Read More

16 तासांच्या थरारनाट्यानंतर अपहरण झालेली चिमुकली आईच्या कुशीत

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

‘भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यास पिंपरी चिंचवडमधून पाच हजार नागरिक जाणार’

पिंपरी- प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेला सावरगाव घाट, ता. पाटोदा, जि. बीड येथील दसरा मेळावा देशात प्रसिद्ध आहे. प. पू. भगवान बाबांनी सुरू केलेली परंपरा पुढे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांनी बहुजन वंचित ऊसतोड कामगारांसाठी चालू ठेवली. मुंडे साहेबां नंतर पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे चालू ठेवली आहे. हा देशातील सर्वांत…

Read More

पुण्यात भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र होणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट…

Read More

चोरीसाठी लकी शनिवार ! पुण्याहून मुंबईला जाऊन सोनसाखळी पळवणाऱ्या वृद्ध महिलेला अटक

मुंबई -‘न कर्त्याचा वार शनिवार’ असे म्हणतात. ज्याला काम करण्याची इच्छा नसते तो नेहमी शनिवारचे निमित्त सांगून काम करण्याचे टाळत असतो. पण पुण्यातील एक आजी आपली हातसफाई करायला फक्त शनिवारचीच मुंबईला जायच्या. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र लांबवणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनघा जोशी (वय…

Read More

‘ती’ आईशी भांडून घराबाहेर गेली आणि….रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या मृत्यूचे कारण आले समोर… 

बारामती – आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणाच्या तपासाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी…

Read More

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा बुधवारी नागरी सत्कार – योगेश बहल

पिंपरी, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) हॉटेल रागा पॅलेस, मदर तेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी, पिंपरी, पुणे १८ येथे सायंकाळी पाच वाजता या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश…

Read More