पुणे- फिजिकल अॅक्टिव्हिटीच्या नावाखाली शरीरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्याचे आमिष दाखवून तरुणीकडे तिच्या अर्धनग्न फोटोची मागणी करणार्या तथाकथित आध्यामिक गुरुला कोंढवा पोलिसांनी अटक केली.
दिव्य जितेंद्र परमार (वय २३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पनवेल येथील एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की दिव्य परमार हा सोशल इन्फ्लुएंसर आहे. त्याच्याकडे अनेक जण मानसिक शांतीसाठी येत असतात. तो लोकांना व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक पाहण्यासाठी संदेश देत असतो. आपण अध्यात्मिक गुरु असल्याचे सांगून त्याने या तरुणीशी संपर्क साधला. ही तरुणीही त्यांच्याकडे मानसिक शांतीसाठी त्याच्याकडे जाऊ लागली होती.
दिव्य परमार याने फिजिकल अॅक्टिव्हिटीचे नावाखाली तुझ्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी गेलेली आहे. ती काढण्यासाठी तुझे अर्धनग्न फोटो पाठव, अशी मागणी केली. फिर्यादी यांना भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलद्वारे मागवुन घेतले. या तरुणीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी विनयभंग तसेच जादुटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करुन दिव्य परमार याला अटक केली आहे.
त्याचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
