मुंबई- बुधवारी महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्र सायबर ॲन्थममधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने अनेक सेलिब्रिटींचा सन्मान केला. यात कॉमेडियन समय रैनाचाही समावेश होता. त्याच्या सन्मानावर अभिनेता सुनील पालने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे.
या व्हिडिओत सुनील पाल म्हणतो, ” ‘मित्रांनो आज मी शूटिंग करत आहे. आणि मला अशी बातमी मिळाली, महाराष्ट्र सरकारने समय रैनाला सन्मानित केलं. घोर कलियुग आलं, घोर कलियुग. तुम्ही कुठल्या गोष्टीमुळे त्याचा सन्मान करताय, हे तरी सांगा.. असा सवाल राज्य सरकारला सुनील पाल याने केला आहे.
सुनील पाल काय म्हणाला हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/Dch-qF2s1XC/?igsi=NHJnb2o0aGk3bnpx
“तो शिवीगाळ करतो. लेटंटसारखा शो आणतो, ज्यात सहभागी होणारे ही शिव्या देतात. पॅनलही शिवीगाळ करतं. अशा शिव्या दिल्या जातात, ज्या तुम्हाला ऐकवणारही नाही. अशा माणसाचा तुम्ही सन्मान केला. आता कॉमेडीमध्ये येणारे नवे कलाकार, तरुण यांच्यापर्यंत काय संदेश पोहोचणार? सन्मान हवा असेल तर आधी कॉमेडियन बना, शिवीगाळ करा, पोलीस केस करून घ्या, तुमच्या भोवती असा वाद निर्माण करा की तुम्हाला मारत मारत पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल; न्यूजमध्ये या मग तुमचा शो एकदम हिट शो म्हणून बाहेर येईल. जेव्हा तुम्हाला यश मिळेल, तेव्हा तुम्हाला सगळेजण सलाम करतील. जे पोलीस तुम्हाला मारत होते ते तुमची सुरक्षा करतील. जे सरकार तुमच्या विरोधात होतं ते तुमचा सन्मान करेल” व्हिडिओच्या शेवटी सुनील पाल याने’ घोर कलियुग ..घोर कलियुग.. हे देवेंद्र, हे नरेंद्र काय होत आहे, इंदिराजी सगळं पहात आहेत असे म्हटले आहे.
