ब्रेकिंग न्यूज

‘हिंमत असेल तर…. !’ भाजप शहराध्यक्षांनी पोलिसांना काय इशारा दिला ?

पुणे – शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यातच पोलिसांनी येत्या दहीहंडीला डीजे लावण्यास बंदी केली आहे. त्याचा विरोध करताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला. ‘हिंमत असेल; तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा; पुण्याच्या गणेशोत्सवावरच अटी आणि निर्बंध का?’, असा सवाल केला आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे…

Read More

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तरुणीचे अर्धनग्न फोटो मागणाऱ्या आध्यामिक गुरुला अटक

पुणे- फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली शरीरातील निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्याचे आमिष दाखवून तरुणीकडे तिच्या अर्धनग्न फोटोची मागणी करणार्‍या तथाकथित आध्यामिक गुरुला कोंढवा पोलिसांनी अटक केली. दिव्य जितेंद्र परमार (वय २३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पनवेल येथील एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस…

Read More

तरुणाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी असा आणला प्लॅन उघडकीस

पुणे – मोठ्या भावाकडून पैसे घेण्यासाठी एका १९ वर्षाच्या तरुणाने आपले अपहरण झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी काही तासातच त्याचा प्लॅन उघडकीस आणला. मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेला १९ वर्षीय तरुण ओम प्रकाश गौरीशंकर हा नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर बेरोजगार असल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत होती. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि…

Read More

पुणे विमानतळावरून तरुण बेपत्ता, १८ दिवसापासून ठावठिकाणा नाही 

पुणे – दुबई-अबूधाबी येथे नोकरी करणारा तरुण दिल्लीला जात असताना पुणे विमानतळावर उतरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  मो. अफजल असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत मो. फैसल (रा. मोहल्ला कोटरा, ता. शेरकोट, जि. बिजनौर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत…

Read More

‘सर्पदंश’ अधिसूचित आजार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – सर्पदंश हा आजार राज्‍य शासनाने आता अधिसूचित आजारांच्‍या यादीत टाकला असून प्रत्येक दंशाची नोंद आरोग्‍य विभागाला कळविणे सरकारी व खासगी दवाखान्‍यांना बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन अधिसूचनेनुसार, गंभीर आणि प्राणघातक प्रकरणांची माहिती तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांना देणे बंधनकारक आहे. या प्रकरणांची नोंद ‘एचएमआयएस/ डीएचआयएस-२’, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम किंवा…

Read More

नवले पुलावर पुन्हा अपघात ५ ते ६ वाहनांची धडक रिक्षाचालक गंभीर

पुणे- कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अपघाताची घटना समोर आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक…

Read More

पिंपळवंडी बालिका हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार – सुनेत्रा पवार

मुंबई – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण…

Read More

२२ लाखांच्या अमली पदार्थांसह राजस्थानातील दोघेजण गजाआड, मलठणमध्ये मध्यरात्री झाली कारवाई

पुणे- शिरूर तालुक्यातील मलठणगावच्या हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह २२ लाख रुपये किमतीचे ११० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहेत. सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१), (दोघेही मूळ राहणार राजस्थान सध्या मलठण) आरोपींच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याच्या…

Read More

जुन्नर तालुक्यात पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शेतात नेऊन निर्घृण हत्या 

जुन्नर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली आहे. घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे उघडकीस आलं आहे.  काही दिवसांपूर्वी नसरापूर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. घराशेजारी…

Read More

सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद, मातेची मृत्यूशी झुंज

बीड- वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. संध्या गायकवाड असे या तरुणीचे…

Read More