ब्रेकिंग न्यूज

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू 

पुणे- पुणे पोलिसांनी शहरात १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, या दरम्यान राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सलग येणारे सण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीही होते. यातच अतिक्रमण हटवण्याची कारवाईसुद्धा केली जाणार आहे. अशावेळी गर्दी होऊन…

Read More

आयुष्यात ‘चार एफ’ महत्त्वाचे, प्र-कुलगुरूंनी साधला ‘जेन-झी’शी संवाद 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मंगळवारी ‘जेन-झी’शी संवाद साधला. खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘भविष्यवेध : युवा विद्यार्थ्यांशी संवाद’ या विशेष उपक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील संधी, आव्हाने आणि यशाचा मार्ग याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी ‘चार एफ’चा प्रभावी मंत्र दिला. ‘फाइन्ड म्हणजे…

Read More

सिंहगड रस्त्यावर अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – सिंहगड रोड परिसरात एका घरात देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २ इसमांना अटक केली. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने सोमवारी (दि. १७)मध्यरात्री २ वाजता केली. अभिषेककुमार सुरजन बिन, (वय 20 वर्षे, रा. साई नगर हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे), आदित्य राजू…

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला कात्रज परिसरातून घेतले ताब्यात, युनिट २ ची कारवाई

पुणे- गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कात्रज चौक परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने सोमवारी (दि. १७) रोजी केली. रोशन उर्फ सोन्या घोरपडे (वय २९ रा. वडगाव बुद्रुक ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिराडे…

Read More

विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी येणार, कार्यक्रमाची तारीख ठरली

बारामती- “विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या वास्तूमध्ये गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे….

Read More

महाळुंगे येथे रस्त्यावरील खड्ड्याने घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव

पुणे – रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ ही दुर्घटना घडली.  या घटनेची माहिती अशी की ११ वर्षाचा मुलगा त्याचे वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्यूशनला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरल्यामुळे मुलगा रस्त्यावर पडला…

Read More

चोरीसाठी लकी शनिवार ! पुण्याहून मुंबईला जाऊन सोनसाखळी पळवणाऱ्या वृद्ध महिलेला अटक

मुंबई -‘न कर्त्याचा वार शनिवार’ असे म्हणतात. ज्याला काम करण्याची इच्छा नसते तो नेहमी शनिवारचे निमित्त सांगून काम करण्याचे टाळत असतो. पण पुण्यातील एक आजी आपली हातसफाई करायला फक्त शनिवारचीच मुंबईला जायच्या. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र लांबवणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनघा जोशी (वय…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा दणका! ठोठावला ५ लाखांचा दंड

मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे. याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी…

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर…

Read More

तीन अल्पवयीन मुलांचा येरवड्यामधील निरीक्षणगृह कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे – तीन अल्पवयीनांनी येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील मुलांच्या शासकीय निरीक्षणगृहात एका कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More