ब्रेकिंग! पुण्यात कोलवडी येथे उद्योजकावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्राने वार

ब्रेकिंग! पुण्यात कोलवडी येथे उद्योजकावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्राने वार 
Share

पुणे – पुण्यात लोणीकंद जवळील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचा थरारं सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

सचिन लोणकर ऑफिसबाहेर पडताच त्यांच्या दिशेने हातात शस्त्र घेऊन दोघेजण आले. त्यांनी अगोदर लोणकर यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर लोणकर यांच्या दिशेने धावत गेले. हल्लेखोरांना पाहताच लोणकर जिवाच्या आकांताने पळू लागल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून हल्ल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लोणकर यांच्याकडे खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्यात सचिन लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Vedh News