सासरच्या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने जीवन संपवले; दौंड तालुक्यातील घटना

दौंड – सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पिंपळगाव ( ता. दौंड) येथे केली आहे. सदर घटना मंगळवार (दि.२९) सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने यांनी यवत पोलिसांत तक्रार दिली आहे.
पायल विशाल जाधव (वय २४ वर्षे रा. पिंपळगांव ता. दौड जि पुणे) असे या दुर्दैवी विवाहितेची नाव आहे. या प्रकरणी पूजा हनुमंत माने (वय ५० वर्षे रा. आदित्य गार्डन, शिक्षक कॉलनी बीड रोड जामखेड ) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती विशाल बबन जाधव ( वय ३० वर्षे ) मावस सासू बानुबाई मनोहर जाधव ( वय ५० वर्षे) मावस सासरे मनोहर जाधव ( वय ५२ वर्षे, सर्व रा. पिंपळगांव ता. दौड जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दाखल फिर्यादीनुसार, आरोपींनी २०२३ पासून सलग तीन वर्षे पायल जाधव हिचा शारीरिक व मानसिक छळ केला होता. या त्रासाला कंटाळून पायल हिने गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या सदर्भात अधिक तपास अंमलदार हेमंत भोसले करत आहेत.






