ब्रेकिंग न्यूज

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खासदार संजय राऊत

पिंपरी- कलाकारांना, क्रीडापटूंना, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला आहे. रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार तीन दिवसीय पिंपरी-चिंचवड महोत्सव

पिंपरी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून…

Read More

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत – डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी- ‘भारत हा कोणत्याही एका महामानवाचा, एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महामानवांच्या मानवतावादी सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत…

Read More

चाकणचा कचराप्रश्न सुटला ; 36.5 एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

पिंपरी – चाकण एमआयडीसी आणि परिसरात घनकचऱ्याचा प्रश्न गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चाकण, राजगुरुनगर नगरपरिषदेसह परिसरातील १७ ग्रामपंचायती, अशा एकूण १९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पीएमआरडीए मार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील पॉइंट क्रमांक ४ येथे ईएसआरजवळील ३६.५ एकर…

Read More

पिंपरी चिंचवड महापालिकेत श्वान आणून आंदोलन, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या आवारात पाळीव श्वान आणून अनोखे आंदोलन करण्यात आले.  पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि लहान मुले व नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी दि.२० राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीबाहेर श्वान सोबत आणून एक अनोखे आणि…

Read More

हौसिंग सोसायटयांच्या प्रक्रिया केलेल्या पाण्यावर शुल्क ; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केलेल्या अतिरिक्त पाण्याचा मनपाच्या ड्रेनेज लाईनला जोडण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ४९४ खाजगी सांडपाणी प्रकल्प आहेत. त्यापैकी ३६९ प्रकल्प सुरू असून, १२५ प्रकल्प अद्याप बंद असल्याचे पर्यावरण विभागाच्या सर्वेक्षणात समोर…

Read More

राज्यात सुटे खाद्यतेल विकण्यास मनाई, तुकाराम मुंढे यांचा आदेश

मुंबई- महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातर्फे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात २० ऑगस्ट २०२६ पासून सुट्टे खाद्यतेल विकण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, खाद्यतेलाची विक्री सुट्ट्या स्वरूपात…

Read More

सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व ! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी- ‘कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने प्रगती प्रेस टूल्स इंडिया प्रा. लिमिटेड या आस्थापनाला पद्मश्री नारायण सुर्वे प्रगतशील उद्योग पुरस्कार प्रदान करून गौरविताना डाॅ….

Read More

एस आय आर मोहिमेत मतदारांची अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. आता ३१ ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

शिवसेनेच्या वतीने ३० ऑगस्टला नोकरी मेळावा, दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी 

पिंपरी- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि. ३० ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजता, चिंचवड गावातील चिंचवडे लॉन्स येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, समन्वयक किरण राहणे, दीपक…

Read More