ब्रेकिंग न्यूज

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर ! म्हाडाकडून ४,४६२ घरांची सोडत जाहीर

पुणे- म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल ४४६२ घरांच्या संगणकीय सोडतीची घोषणा केली आहे. घरांच्या किमती सुमारे १३ लाख रुपयांपासून पुढे असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे स्वप्नातील घर साकार होणार आहे. या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत…

Read More

महापालिकेच्या प्रत्येक विभागातील आदेश, परिपत्रकाची स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ करण्याचे निर्देश 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांकडून वेळोवेळी जारी होणारे कार्यालयीन आदेश, परिपत्रके, सूचना, शासन निर्णय तसेच महत्त्वपूर्ण प्रशासकीय आदेश यांची व्यवस्थित नोंद व जतन करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ अथवा ‘कार्यालयीन आदेश फाईल’ तयार करून ती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. विभागप्रमुखांच्या…

Read More

नागा साधू असल्याची बतावणी करून कारचालकाची पळवली अंगठी, मोरवाडी भागातील घटना 

पिंपरी – लिफ्ट मागून कारमध्ये बसलेल्या एका भोंदू साधूने आपण नागा साधू असल्याचे भासवून एका कारचालकाची सोन्याची अंगठी लांबवली. हा प्रकार पिंपरी चिंचवड मधील मोरवाडीमध्ये शनिवारी (दि. २२) दुपारी १ च्या सुमारास घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४९ वर्षीय इसम आपल्या कारमधून मोरवाडी येथील आयुक्त कार्यालयाच्या समोरून जात असताना भगवे कपडे घातलेल्या अनोळखी व्यक्तीने…

Read More

पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात पडल्या, रविवारी विवाहबद्ध होणार !

पुणे- पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकांच्या प्रेमात पडल्या असून या दोघीनी रविवारी ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. या प्रकारची पिंपरी- चिंचवड पोलीस दलामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबतची माहिती अशी की, पोलीस भरतीच्या काळात दोघींची ओळख झाली. त्यानंतर दोघींची पोलीस शिपाईपदावर नेमणूक झाली. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात…

Read More

पुणे मेट्रोचा विस्तार चाकण, राजगुरूनगर, तळेगाव शिक्रापूर पर्यंत होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

चाकण- चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पुणे मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. निगडी ते चाकणनंतर आता चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

खासगी कोचिंग क्लासेसला राज्य सरकार लावणार शिस्त, काय आहेत नवीन नियम ?

मुंबई- नीट परीक्षेतील घोटाळा, खासगी क्लास संचालकांकडून पेपर फोडले जाण्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेसकडे आपली नजर वळवली आहे. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेशिस्त आणि मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला असून कोचिंगचे वर्ग दिवसाला जास्तीत जास्त पाच तासच घेता येणार आहेत. तसेच…

Read More

राजगुरूनगर तालुक्यात १८ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

राजगुरूनगर – राजगुरूनगर जवळील थिगळस्थळ येथे एका १८ वर्षाच्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  हर्ष हिरामण मांजरे (वय १८, रा. पांडुरंगनगर, थिगळस्थळ, राजगुरूनगर, मूळ रा. मांजरेवाडी पिंपळ, ता. खेड) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष रात्री सव्वानऊच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ झाला तरी…

Read More

श्रावणधारा कविसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी- शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगेतून शुभ्रधवल पाण्याच्या धारा खळाळत होत्या आणि पायथ्याच्या अथांग जलाशयात विसावत होत्या. निसर्गसंपन्न आसमंतात श्रावणसरी बरसत होत्या आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिवे गावातील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात सुरेल शब्दांच्या सरी बरसत होत्या! कविता, भावना, विचार आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवत ‘श्रावणधारा कविसंमेलन’ मोठ्या उत्साहात रंगले होते.  खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न शिवे येथील…

Read More

‘अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती’ -पद्मश्री गिरीश प्रभुणे 

पिंपरी – अवयवदान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय.कारण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान आधिक श्रेष्ठ आहे. म्हणून गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम व महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी…

Read More

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खासदार संजय राऊत

पिंपरी- कलाकारांना, क्रीडापटूंना, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला आहे. रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव ठाकरे जबाबदारीने काम करीत आहेत असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त…

Read More