चिंचवड येथे साडेनऊ लाखांच्या बॅटऱ्या, मोटर्सची चोरी; अल्पवयीन मुलासह भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – मोहननगर येथील सर्व्हिस सेंटरमधून ९ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या, मोटर्सची चोरी; अल्पवयीन मुलासह भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
चिंचवड येथील एका सर्व्हिस सेंटरमधून सुमारे ९ लाख ८६ हजार रुपयांच्या बॅटऱ्या आणि इलेक्ट्रिक मोटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एक भंगार व्यावसायिक आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्वाती मनीष मोहिते ( वय ४६ रा. भक्ती शक्ती अपार्टमेंट, चिंचवड )
यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ दरम्यान हा प्रकार चिंचवड येथील जय मातादी सर्विस सेंटरमध्ये घडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ट्रेनिंगच्या निमित्ताने काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने ९ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या ईव्ही टुव्हिलरच्या बॅटऱ्या व ईव्ही मोटर चोरून नेल्या. त्यानंतर हा माल चिखलीतील एका भंगार व्यावसायिकास विकल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलगा तसेच भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप दोन्ही संशयितांना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.





