ब्रेकिंग न्यूज

पिंपरीत अल्पवयीन सख्या बहिणींवर ६५ वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी- सख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षाच्या नराधमाला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या नराधमाने १० वर्षाच्या मुलीवर चारवेळा तर चार वर्षाच्या तिच्या बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. रमजान बन्नूसाब बागवान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सो आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

Read More

तळेगाव स्टेशनवर असहाय तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना जन्मठेप

पुणे – कौटुंबिक वादाला कंटाळून घरातून पळून आलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शरद मुरलीधर साळवे (वय ४०, रा. गदाखेडा, छत्रपती संभाजीनगर) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्त उर्फ कांचा (वय ४०, रा. काटे कॉलनी, रावेत) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात १८ वर्षीय पीडितेने पुणे लोहमार्ग पोलिसांकडे…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात ‘एनजीटी’चा दणका, एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश

पिंपरी- मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एक संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक एक सदस्य आणि जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असणार…

Read More

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी (प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या…

Read More

डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

पिंपरी(प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा “शिक्षणमहर्षी” या सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकर जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे शहर…

Read More

पवना धरण ९३ टक्के भरले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मागील काही दिवसांपासून संततधार पावसामुळे पवना धरण गुरुवारी (दि.२३) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९३.१० टक्के भरले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी नदीपात्रामधील आपले साहित्य, शेती अवजारे कृषी पंप, जनावरे नदीपात्रापासून…

Read More

नीट – यूजी २०२६ (NEET-UG) मध्ये अतुल्या डोंगरेची देदीप्यमान भरारी; ६७० गुणांसह देशात ४९८ वा क्रमांक

पिंपरी – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट – यूजी (NEET-UG) २०२६ मध्ये वाकड येथील अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने ७२० पैकी ६७० गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि…

Read More

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानवमुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव…

Read More

संविधान हे वकिलांची भगवद्गीता! – ॲड. सतिश गोरडे

पिंपरी – ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानातून निर्माण झालेले भारतीय संविधान हे वकिलांची भगवद्गीता आहे!’ असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी गणेशनगर, दापोडी येथे व्यक्त केले. एस. एस. पी. शिक्षण संस्था संचलित एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड….

Read More

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

पिंपरी, पुणे – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला.      गुरुवारी  सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड, भोसरी…

Read More