ब्रेकिंग न्यूज

पुणे नाशिक रेल्वेमार्ग नारायणगाव, संगमनेर मार्गेच व्हावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात जीएमआरटीचे आक्षेप समजून घेण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना नेमकं ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत असा सवाल विचारला, त्याचबरोबर हा रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच व्हावा ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड…

Read More

EMI वर मोबाइल घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी… आरबीआय ने बँकांना काय अधिकार दिले ?

मुंबई- महागडे स्मार्टफोन बऱ्याचदा एकरकमी पैसे न देता हप्त्यावर घेतला जातो. त्यामुळे हप्त्यावर मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. EMI चा हप्ता थकल्यानंतर काही वित्तीय संस्था ग्राहकांचा मोबाईल रिमोट लॉक करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यामुळे फोनचा वापरच बंद होत असल्याने काम, संवाद आणि आपत्कालीन सेवांवरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक…

Read More

दूध २ रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थ १० टक्क्यांनी वाढणार, मंगळवारपासून दरवाढ लागू

मुंबई- इंधनाच्या दरामध्ये वाढ, पॅकिंगच्या कच्च्यामालाच्या दरामध्ये वाढ तसेच साखरेचे भाव वाढल्यामुळे गे आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दारात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील खासगी, सहकारी दूध संघानी घेतला आहे. ही दरवाढ येत्या मंगळवार (दि. ११) पासून लागू होणार आहे. राज्यातील प्रमुख खासगी आणि सरकारी दूध संघांच्या सभासदांची बैठक आज, शुक्रवारी कात्रज डेअरी येथे झाली….

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण ; सीबीआयच्या आरोपपत्रात NTA च्या ३ विषय तज्ञांसह १३ आरोपींची नावे

नवी दिल्ली – नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) दिल्लीतील रौस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ३ विषय तज्ज्ञांसह एकूण १३ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तज्ज्ञांनी ओखला येथील एनटीएच्या कार्यालयातील गोपनीयतेच्या त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका आधीच फोडली आणि पैशांसाठी ती कोचिंग क्लासचालक व मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली…

Read More

१६ ऑगस्ट २०२६ पर्यंत गॅस सिलेंडरसाठी ई-केवायसी बंधनकारक; अन्यथा…

नवी दिल्ली – बुकिंग आणि अनुदानाचा लाभ विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता आधार-आधारित ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशा ग्राहकांना घरगुती सवलतीच्या दरांऐवजी महागड्या व्यावसायिक दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा…

Read More

परवानगी शिवाय सराव नाही… ढोल-ताशा पथकासाठी महापालिका नियमावली करणार

पुणे- पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या तयारीला हळू हळू रंग येत आहे. या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे ढोल ताशा पथक. परंतु या पथकाच्या सरावामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिका ढोल-ताशा पथकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहे. या नियमावलीनुसारच पथकांना सराव करता येईल. पुणे शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. ढोल-ताशांसह लेझीम, टिपरी,…

Read More

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मजनू नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द

तळेगाव दाभाडे- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश दिला. तळेगाव प्रभाग क्र १० अ मधील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मजनू हनुमंत नाटेकर यांनी तर करून प्रकाश सरोदे यांनी अर्ज दाखल केला होता. नाटेकर यांनी अनुसूचित जातीसाठीच्या…

Read More

लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे

भोसरी – समाजसेवेची दोन दशकांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे यांची नियुक्ती झाली आहे. लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डने २० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून २१ व्या सेवा वर्षात दिमाखदार प्रवेश केला आहे. या क्लबच्या माध्यमातून भोसरी–पिंपरी-चिंचवड परिसरात सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. यंदाच्या सेवा वर्षासाठी चार्टर…

Read More

बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू

लोणावळा- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या लिंबाच्या बोगद्यात वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बोगद्यामध्ये बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या सी सी टीव्ही फुटेजमधून एक अतिशय धक्कादायक बाब पुढे आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव वेगात…

Read More

हिंजवडीमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या, प्रेयसी जखमी

पुणे- एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, या हल्ल्यात गर्लफ्रेण्ड देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ७) हिंजवडी परिसरात घडली. सागर गायकवाड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तर दिनेश महादेव झांबरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव…

Read More