ब्रेकिंग न्यूज

निलेश साबळे आणि भाऊ कदम जोडगोळी आता नव्याकोऱ्या शोमधून करणार रसिकांचे मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळवून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आणि भाऊ कदम आता नवा शो घेऊन आले आहेत. रसिकांना या नव्याकोऱ्या शो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे. पण, हा कार्यक्रम ‘चला हवा…

Read More

शैक्षणिक क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांनी घेतला शिवसृष्टी येथील शिवरायांच्या पराक्रमाचा थरारक अनुभव!

पिंपरी -छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर, चिंचवड या शाळेतील प्राथमिक विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच कात्रज येथील शिवसृष्टी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. शिवसृष्टीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या यथासांग कार्याची अतिशय सुंदर अशी प्रात्यक्षिके आणि गड किल्ल्यांची माहिती मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता….

Read More

‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती म्हणजे समाज घडवणारी योजना : पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे- शिक्षणामुळे केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी ‘विनायकी’ विनायक निम्हण शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असे प्रतिपादन सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर…

Read More

बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

बारामती- बारामतीचे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे…

Read More

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सदनिकाधारकांनी महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी घ्यावी

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी १ ऑक्टोबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे. एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर…

Read More

पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न   पिंपरी, पुणे  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या नुकताच माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यात एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा…

Read More

साहित्यिक हा लोककलेचा आत्मा – रघुवीर खेडकर

पिंपरी – ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, ते समाजाला दिशादर्शक असते. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे!’ असे उद्गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी काढले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य…

Read More

हडपसरमध्ये संगणक अभियंत्याची आत्महत्या ; १५ व्या मजल्यावरून मारली उडी

पुणे- हडपसर भागात एका ३३ वर्षीय संगणक अभियंत्याने १५ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुल (पूर्ण नाव समजले नाही )(वय ३३ वर्षे), हा मूळचा ओडिशा राज्यातील सुगडा गावचा रहिवासी…

Read More

राहुल गांधी इफेक्ट ? प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठक, मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण भाजप पुण्यात

पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता…

Read More

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता 

 पिंपरी – मराठी सारस्वताचा अभिमान पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे…

Read More