ब्रेकिंग न्यूज

बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

Share

बारामती- बारामतीचे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान बारामती विमानतळावर उतरत होते. त्याचवेळी विमानाचा ताबा सुटून ते रनवेच्या बाहेर घसरले. विमानतळ परिसरातच ही घटना घडल्याने तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच विमानतळाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विमानातील व्यक्ती सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, विमान रनवेवरून घसरण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज घडलेल्या या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या घटनेमुळे बारामती विमानतळाच्या परिसरात काही काळ नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनाही बारामती इथं झालेल्या विमान अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.