‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळवून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आणि भाऊ कदम आता नवा शो घेऊन आले आहेत. रसिकांना या नव्याकोऱ्या शो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे. पण, हा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ नाही, तर नव्या कार्यक्रमातून दोघेही दणक्यात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट असून भाऊ कदम आणि निलेश साबळे एकदम स्टायलिश अंदाजात पाहायला मिळत आहेत. प्रोमोमध्ये दोघेही पाठमोरे उभे आहेत, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. तरीसुद्धा चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या कलाकारांना अचूक ओळखलं आहे. त्यामुळे दोघे आता काय घेऊन येणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
