ब्रेकिंग न्यूज

शहरात विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रम उत्साहात

Share

चिंचवड:- संपूर्ण विश्वाला शांती चा संदेश देण्यासाठी विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या विवीध भागातील शिक्षण संस्था, जैन मंदीर, स्थानक या ठिकाणी सुमारे सतरा हजार भक्तांनी सामुदायिक मंत्र पठण केले.जितो चिंचवड-पिंपरी ने कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले.

नवकार महामंत्र पठण कार्यक्रम जगातील १०८ देशात घेण्यात आला.मुख्य कार्यक्रम दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.याचे प्रत्यक्ष प्रेक्षपण व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड मधील जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात जितो ने आयोजन केले होते.या प्रसंगी दोन हजाराहून अधिक भावीक उपस्थित होते.अध्यक्ष आनंद मुथा यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रर्माची सुरवात झाली.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, जितो च्या पदाधिकारी तुप्ती कर्नावट ,दिलीप सोनिगरा,प्रकाश गादीया,संतोष धोका यांच्या सह जैन साध्वी उपस्थित होते.सध्या विश्वाला शांतीचा संदेश मिळणे महत्वाचे असल्याचे मत साध्वी संबोधीजी म.सा.यांनी व्यक्त केले. नवकार महामंत्राचे महत्व सांगितले.शहरातील भोसरी,दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागातील जैन मंदीर व स्थानकात याचे आयोजन करण्यात आले होते.चिंचवड मधील प्रतिभा विद्यालय, जैन प्रसारक विद्या मंडळाच्या विविध विभागात याचे आयोजन केले होते.

जैन विद्या प्रसारक मंडळाचे मुख्य सेक्रेटरी राजेंद्र मुथा,अनिल कांकरिया यांचे महत्वपूर्ण योगदान मिळाले.कार्यक्रमाची मुख्य संकल्पना अपैक्स डायरेक्टर जोन चेअरमन राजेंद्र जैन यांनी मांडली.महिला अध्यक्षा पूनम बंब, सचिव मीना टाटीया, युवक अध्यक्ष ऋषभ गादीया,सचिव अनुज चोपडा आणि त्यांच्या टीम चे सहकार्य मिळाले.सेक्रेटरी हर्षद खिवंसरा यांनी सूत्रसंचालन केले.मुख्य सेक्रेटरी तुषार लुणावत यांनी आभार मानले.

हेमंत गुगळे,प्रसन्ना चोपड़ा,सचिन धोका,अभिजीत लुनिया,मयूर शिंगवी नवनीत बोरा यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले. समाजातील मान्यवर प्रा.अशोक पगारिया,नंदकुमार लूणावत,विलास पगारिया,सुभाष ललवानी, दिलीप नहार सागर सांकला आदि मान्यवर उपस्थित होते.