ब्रेकिंग न्यूज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक, घडला मोठा स्कॅम

मुंबई- सध्या सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लुबाडण्याचा प्रकार घडतो. पण या सायबर गुन्हेगाराच्या तावडीतून सेलिब्रिटी देखील सुटले नाहीत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरात सोबत असाच प्रकार घडला. डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नाही, असा कॉल करून एका व्यक्तीने वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करून अनेकांकडून तब्बल ६२ हजार…

Read More

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारे रॅकेट ,पाच जणांना अटक

पुणे- नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. अथर्व इंद्रजित शिंदे (वय २४, रा. उर्मिला सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी), अविनाश शिवा बळुंगी (वय २२, रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी), प्रदीप जितेंद्र हुंबरे (वय २६,रा. सिद्धीविनायक सोसायटी, आंंबेगाव), पीयूष गणेश भरम (वय २६, रा….

Read More

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पिंपरी, पुणे – पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर…

Read More

राम गोपाल वर्मा काढणार एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर सिनेमा

सत्या, कंपनी, डी, सरकार यासारखे अनेक गाजलेले सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा. गेल्या काही वर्षांपासून राम गोपाल वर्मा यांचे नाव बॉलिवूडमधून पुसले गेल्यासारखे झाले आहे. कारण त्यांचे थरारक सिनेमे पाहण्याची संधी बॉलिवुडप्रेमीना खूप वर्षांपासून मिळालेली नाही. पण आता प्रतीक्षा संपली आहे. लवकरच राम गोपाल वर्मा एका नाव सिनेमा घेऊन येणार आहेत. कोणता…

Read More

बारामतीत महाविद्यालयीन तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बारामती- मागील महिन्यात बारामती शहरात एका अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली असतानाच १६ वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने बारामती शहर पुन्हा हादरून गेले आहे. शहरातील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून उडी मारून या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. प्रज्ञा सुनील शिंदे (वय १६ वर्षे)…

Read More

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू 

अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरिन रुग्णालय) नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीन वाजता वेंटिलेटरमधील स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरात गुदमरल्यामुळे ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६ बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार,आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या…

Read More

‘तुम्ही स्वत:ला देव समजता का ?’ मुंबई उच्च न्यायालयाने ‘एफडीए’ला फटकारले

मुंबई- एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएकडून होत असलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकाकांकडून कौतुक होत आहे. परंतु या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल, कॅन्टीन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशाच एका कारवाईनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने एफडीएला कडक शब्दात समज दिली. तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता…

Read More

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन

पुणे : शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यार्थी चळवळ, अध्यापन, राजकीय-संघटनात्मक कार्य आणि राज्याच्या शिक्षणविषयक धोरण प्रक्रियेत त्यांनी दीर्घकाळ काम केले. ढेकणे…

Read More

अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला लावणार

भोसरी –भाजपचा एक एक उमेदवार विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत करणे हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे. ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चोरण्याबरोबर, सरकार पाडण्यापर्यंत निंदनीय काम केले. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार युवा सेनेच्या मेळाव्यात करण्यात आला. भोसरी विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षात दाखवण्यासारखे काहीच काम केले नाही म्हणून आता…

Read More

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात —मा नगरसेवक संदीप वाघेरे व मित्रपरिवार बीड सोलापूरकडे रवाना

पिंपरी प्रतिनिधी : बीड व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य संदीप वाघेरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने हाती घेतले आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक साहित्याचे किट तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मदतपथक रवाना झाले आहे. या मदतीच्या उपक्रमात रि. पा. इं.चे…

Read More