ब्रेकिंग न्यूज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक, घडला मोठा स्कॅम

Share

मुंबई- सध्या सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लुबाडण्याचा प्रकार घडतो. पण या सायबर गुन्हेगाराच्या तावडीतून सेलिब्रिटी देखील सुटले नाहीत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरात सोबत असाच प्रकार घडला. डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नाही, असा कॉल करून एका व्यक्तीने वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करून अनेकांकडून तब्बल ६२ हजार रुपये लुबाडले. या प्रसंगाचा व्हिडिओ वनीता खरात हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय म्हणाली वनीता खरात ?

‘ काल माझ्याबरोबर एक गोष्ट घडली. एक scam झालाय. तुमच्या बरोबर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. माझं एक पार्सल येणार होतं. आणि मला एक फोन आला. ‘ ब्लू डार्ट कंपनीमधून बोलतोय, तुमचं पार्सल येणार आहे पण डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता मिळत नाहीये. त्यामुळे तुमचा पत्ता या- या नंबर वर पाठवा. मी त्याला म्हणाले की, ‘माझा पत्ता आहे ऑलरेडी.. जिथून मी पार्सल मागवलं आहे त्यांच्याकडे. त्यामुळे असं होऊच शकत नाही, असं होत नाही.’ पण त्याने दोनदा तीनदा फोन केले. आणि मी त्याने जो कुठला नंबर सांगितला होता तो डायल केला. आणि काही सेकंदात माझं व्हाट्सअप हॅक झालं. माझ्या फोनमधून लॉग आऊट झालं. त्याने माझे कॉल्स त्याचा नंबरवर फॉरवर्ड केले. मला फोन घेणं बंद झालं. माझ्या व्हाट्सअप वरून सगळ्या माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टला जेवढे नाव होती त्या सगळ्यांना असा मेसेज गेला- की तुम्ही मला मदत करू शकता का.. मी खूप अडचणीत आहे.. मला एवढे एवढे पैसे पाठवा.. ६२ हजार वगैरे पाठवा.. त्यामुळे त्यावर माझ्या बऱ्याच मित्रांनी रिप्लाय केले. काही काहींनी पैसे पाठवले.’

वनीता खरात हिने इतरांना सावध करण्याच्या हेतूने म्हणाली की ‘तुमच्या बाबतीत असं काही घडलं तर सायबर सेलला कंप्लेंट करा. व्हाट्सअपवर असे काही मदतीचे मेसेज आले तर आधी क्रॉस चेक करा. पैसे पाठवण्याच्या आधी करा. खूप काळजी घ्या’

काय म्हणाली वनीता खरात हे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://www.instagram.com/reel/DcQzUKpipcX/?igsi=eDdpcjN5ZWwwcXho