ब्रेकिंग न्यूज

राहुल गांधी इफेक्ट ? प्रदेश भाजप कार्यकारिणी बैठक, मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण भाजप पुण्यात

पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता…

Read More

अमरनाथ सेवा ट्रस्ट पुणे भोसरी यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सवानिमित्त फराळ वाटप

भोसरी -पिंपरी चिंचवड शहरात महाशिवरात्री उत्सवा निमित्त भाविकांनी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरनाथ सेवा ट्रस्ट पुणे भोसरी यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सवानिमित्त फराळ वाटप करण्यात आला. मोशी प्राधिकरण संतनगर आहार हॉटेल कॉर्नर या ठिकाणी भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला .सकाळी सात पासूनच भक्तांसाठी साबुदाणा खिचडी तसेच…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण ; सीबीआयच्या आरोपपत्रात NTA च्या ३ विषय तज्ञांसह १३ आरोपींची नावे

नवी दिल्ली – नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) दिल्लीतील रौस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ३ विषय तज्ज्ञांसह एकूण १३ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तज्ज्ञांनी ओखला येथील एनटीएच्या कार्यालयातील गोपनीयतेच्या त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका आधीच फोडली आणि पैशांसाठी ती कोचिंग क्लासचालक व मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली…

Read More

तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव

मुंबई- अभिनेते राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता त्याच्या घरावरही संकट ओढावले आहे. बँकेने त्यांच्या वडिलोपार्जित घरावर जप्ती आणल्यामुळे राजपाल यादव यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्यांच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10…

Read More

पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून सात पिस्तुलांची चोरी, कचरा गोळा करणाऱ्या इसमास अटक

पुणे- एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून चक्क सात पिस्तुले चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बंडगार्डन पोलिसांच्यामुद्देमाल कक्षामध्ये घडला. पिस्तुले चोरणाऱ्या व्यक्तीने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. संबंधित व्यक्तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी धावाधाव करून पिस्तुले चोरणाऱ्या इसमास ताब्यात घेतले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा दणका! ठोठावला ५ लाखांचा दंड

मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे. याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी…

Read More

गणवेश शिवला, बनावट ओळखपत्र बनवले ..पण अखेर हवाई दलाला संशय आलाच

पुणे- पुण्यातील लोहगाव परिसरात हवाई दलाचा बनावट जवान बनून फिरणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला लोहगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून हवाई दलातील बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला आहे. शुभम विलास अंबुरे (वय २६, सध्या रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, ता. शिरुर, जि. पुणे) असे या हवाई दलाच्या तोतया तरुणाचे…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये होणार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावाला अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये महाविद्यालये कुठे सुरु करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या सभेला प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ….

Read More

विद्यार्थी विकसित भारताचे भविष्य – आमदार शंकर जगताप

  पिंपरी  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. गेल्या २१ वर्षांपासून पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवीत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर…

Read More

फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार होणार, पुणे पोलिसांची तत्त्वतः मान्यता 

पुणे – पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारिकरणासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. बुधवार पेठेतील महापालिकेच्या सिटी सर्व्हे…

Read More