नवी दिल्ली – नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने (CBI) दिल्लीतील रौस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ३ विषय तज्ज्ञांसह एकूण १३ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या तज्ज्ञांनी ओखला येथील एनटीएच्या कार्यालयातील गोपनीयतेच्या त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका आधीच फोडली आणि पैशांसाठी ती कोचिंग क्लासचालक व मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली असा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआय ने दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन विषय तज्ज्ञांची नावे आहेत.
वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ मनीषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्र तज्ज्ञ प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्र तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार असे हे NTA चे तीन विषय तज्ज्ञ आहेत. या तिघांच्या मोफत प्रश्नपत्रिका कोचिंग क्लास आणि मध्यस्थांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. तेथून त्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असा आरोप सीबीआयने केला आहे.
NTA नियुक्त या तीन तज्ज्ञांच्या व्यतिरिक्त अन्य १० आरोपींची नावे दिलेली आहेत. तेजस हर्षद कुमार शाह, शिवराज रघुनाथ मोटेगावकर, डॉ. मनोज भगवानराव शिरुरे, मनीषा संजय वाघमारे, धनंजय निवृत्ती लोखंडे, शुभम मधुकर खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल अशी या आरोपींची नावे आहेत.
