ब्रेकिंग न्यूज

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण सर्वसामान्य कार्यकर्ता नाही, तर तो आहे…

Share

पुणे- विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासात अटक केली आहे. मारहाण करणारा संतोष चव्हाण हा सर्वसामान्य कार्यकर्ता नसून तो एक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष चव्हाण हा पुण्यातील राऊतवाडी भागातील रहिवासी आहे.

बी.कॉम झालेला संतोष चव्हाण हा टिंबर मार्केटमधील एका छोट्या इलेक्ट्रिक दुकानात नोकरी करतो. त्याशिवाय गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण असल्यामुळे त्याच्या विरोधात कट रचणे, प्राणघातक हल्ले आणि मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वीही अनेक गंभीर प्रकरणांत पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, संतोषने तीन वर्षांपूर्वी आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मुलाच्या या कृत्याने वडिलांनी त्याच्याशी असलेले संबंध कायमचे तोडून टाकले होते.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर संतोषने स्वतःचा मोबाईल फोन बंद केला. मात्र, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या तीन तासांच्या आत संतोषच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.