पुणे- शहरात मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून भाजपच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सुमारे १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ललित महाल हॉटेल चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार असून ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक मार्गे गुडलक चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये हजारो दुचाकी एकाचवेळी संध्याकाळी ४ वाजता रस्त्यावर येणार असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
वाहतूक मार्गात बदल
दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.रॅलीच्या मार्गावरील इतर जुने व प्रमुख रस्ते वाहतुकीच्या थरावरून आवश्यकतेनुसार तात्पुरते बंद किंवा वळवले जातील.
पर्यायी मार्ग (वाहनचालकांसाठी)पुणे विद्यापीठ / खडकी दिशेने जाणाऱ्यांसाठी- अलका चौक, खंडोजी बाबा चौकाऐवजी ना. सी. फडके चौक, सेनादत्त चौक, म्हात्रे पूल, नळस्टॉप आणि लॉ कॉलेज रस्त्याचा वापर करावा. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.
