राममंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदावर माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड
अयोध्या- अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) घोषणा झालेली आहे. मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सांभाळण्यासाठी भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच तीन नव्या विश्वस्तांनाही ट्रस्टच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राममंदिरातील देणगी चोरीच्या आरोपांनंतर सरचिटणीस चंपत राय…
