ब्रेकिंग न्यूज

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

Share

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे.

अजित दशावतारे यांच्या मुलीची हत्या झाली की आत्महत्या ही मात्र स्पष्ट झाले नाही. बारामतीतील (Baramati News) रुई येथील साई गणेश नगर येथे फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. थोड्याच वेळात आमदार रोहित पवार बारामतीत येणार आहे.

मुलीचा मृत्यू हत्या की अन्य कारणामुळे झाला, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.