ब्रेकिंग न्यूज

आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Share

पिंपरी- आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्मह्हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी -चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात घडली आहे. या घटनेत काल रात्री कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर आज उपचार सुरु असताना पत्नी आणि १९ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

विनोद पिल्लई (वय ५०, रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी ), शैलजा पिल्लई (वय ४५), मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. पिल्लई कुटुंब मूळचे केरळ येथील असून करिष्मा ग्लोरी सोसायटीत भाड्याने राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार घरात कोळशाचा धूर करून तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.