ब्रेकिंग न्यूज

कापूरहोळ चौकात उद्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पुणे सातारा महामार्गावरील वाहतुकीत असे आहेत बदल

Share

पुणे – भोंगवली येथील जी एस प्रकल्पाच्या विरोधात उद्या रविवारी (दि. २३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सहभागी होणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे सातारा मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

सकाळी ८ पासून आंदोलन संपेपर्यंत पुढील मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

पुण्याहून सातारा येथे जाण्यासाठी – 

कात्रज – खडी मशीन – सासवड – जेजुरी – नीरा – मार्गे सातारा

साताऱ्याहून पुण्यात येण्यासाठी – 

शिरवळ – पंढरपूर फाटा – लोणंद – नीरा – सासवड मार्गे पुणे

पुण्याहून वेल्हा येथे जाण्यासाठी 

कात्रज – कुसगाव – वांगी – आंबेगाव मार्गे वेल्हा

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.