ब्रेकिंग न्यूज

रुपाली चाकणकर ३५ कोटींच्या हॉटेलचे उदघाटन होताच महिला काँग्रेस नेत्याचा एकच प्रश्न ‘ बाई,…..?’

Share

पुणे- राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने एक बार आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या हॉटेलची किंमत ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून काँग्रेसच्या एका महिला नेत्यांने एकच प्रश्न विचारला आहे, ‘बाई एवढी माया आली कुठून?’

दोनच दिवसांपूर्वी या हॉटेलचे उदघाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या हॉटेलचं उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दोनच दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याच्या आरोपावरून उबाठाच्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह तब्बल १९ जणांविरोधात एफआयआर नोंदवला. त्यावरून पुण्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

“The Nines” या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा. हे कल्याणी नगर मधील प्रचंड मोठे रेस्टॉरंट २०,००० स्क्वेअर फिट मध्ये बांधले आहे. ३५ करोड रुपये आजची किंमत आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांना सामान्य नागरिकाचा एकच प्रश्न ?? ‘बाई एवढी माया आली कुठून ? एवढा पैसा करोडोंच्या घरातला कसा कधी मिळविला जरा आम्हाला सांगा ना बाई. वा वा छान राजकारणी दिसतायेत तिथे” असं संगीता तिवारी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तसचं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं. भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगाची हवा खात आहे.परंतु या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.