ब्रेकिंग न्यूज

मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पावर छापा, पोलीस पाहताच स्पा मालक दोन महिलांसह पळाला

Share

पुणे- मसाजच्या नावाखाली स्पामध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍या हडपसर येथील ‘सेव्हन स्पा’वर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. मात्र पोलिसांना पाहताच स्पाचा चालक व मॅनेजरने थेथून धूम ठोकली.

स्पाचालक कपिल ऊर्फ काफिल उद्दीन आणि स्पा मॅनेजर असिफ यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हडपसरमधील डी पी रोडवर ‘सेवन स्पा’ असून त्याठिकाणी स्पाचालक कपिल हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मॅनेजर असिफ मार्फत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची बातमी हडपसर पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला स्पावर पाठवले. बनावट ग्राहकाने इशार्‍याचा मेसेज करताच पोलिसांनी स्पावर छापा टाकला. त्यावेळी स्पाचे मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलीस हवालदार लोणकर यांनी स्पाचे पश्चिम भिंतीला लावलेल्या लोखंडी शिडीने वरती चढून आत प्रवेश केला.

पोलीस आलेले पाहताच स्पाचा चालक व मॅनेजर तसेच दोन पिडित महिला यांनी स्पाच्या भिंतीस असलेल्या जागेमधून बाहेर उडी मारुन पळून गेले. आत प्रवेश केलेल्या हवालदार लोणकर यांनी आतील बाजुला लावलेले लॉक तोडून शटर उघडले. त्यावेळी पोलिसांनी आत प्रवेश केला.

आत प्रवेश केल्यानंतर पोलीस जिन्याने पहिल्या मजल्यावर पोहोचले. तेथे असलेल्या दोन पिडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, स्पाचा मालक काफिलउद्दीन हा त्यांना स्पामध्ये ठेवून त्यांच्याकडून व इतर मुलींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत होता. ग्राहकांकडून मिळालेल्या रक्कमेतून निम्मी रक्कम तो स्वत: घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार बापू लोणकर, पांडे, महिला पोलीस अंमलदार पवार, गायकवाड यांनी केली आहे.