पिंपळे गुरव मध्ये सिलेंडर गॅसचा स्फोट ; दोघे जखमी

पिंपरी – घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना पिंपळेगुरव येथील मोरया पार्क लेन येथे दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, मोरया पार्क लेन येथे एका खोलीत घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी खोलीत १० व्यावसायिक सिलेंडर तर घरगुती ५ सिलेंडर होते. स्फ़ोटात घराचा दरवाजा तुटून उडाला त्र घराबाहेरील टेम्पोचे नुकसान झाले. जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






