डोक्यात सिमेंटची फरशी मारून एकाची हत्या ; पिंपरीच्या नेहरूनगर परिसरातील घटना

डोक्यात सिमेंटची फरशी मारून एकाची हत्या ; पिंपरीच्या नेहरूनगर परिसरातील घटना 
Share

पिंपरी – एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटची चौकोनी फरशी मारून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहरूनगर परिसरात संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यान ही घटना घडली. 

या प्रकरणी चौघांविरुद्ध संत तुकाराम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मृत प्रभाकर कुंडलीक सरकटे (वय ५०) यांचा मुलगा गणेश प्रभाकर सरकटे (वय २४, रा. आंबेडकर नगर पुनर्वसन वसाहत, नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित ऊर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे (रा. पत्राशेड, संतोषी माता चौक, नेहरूनगर), अर्णव ऊर्फ अरव लोकेश ऊर्फ आरब्या (रा. दिघी), प्रणित प्रशांत निकाळजे (वय १९, रा. पत्राशेड, संतोषी माता चौक, नेहरूनगर) आणि सचिन राम साबळे (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. यातील रोहित धोत्रे, प्रणित निकाळजे आणि सचिन साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यानच्या फुटपाथवर प्रभाकर सरकटे यांच्या डोक्यात सिमेंटच्या चौकोनी आकाराच्या फरशीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अज्ञात कारणातून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रभाकर सरकटे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Vedh News