अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपावा – गोपीचंद पडळकर

पिंपरी- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याण, न्याय आणि समाजहिताचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची उंची मोजता येणार नाही. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची उंची लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडमध्ये अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी-पिंपळे गुरव परिसर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ नवी सांगवी येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात झाला.
कार्यक्रमास राज्यसभा खासदार राम वडकुते, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, शंकुतला धराडे, नगरसेवक शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रविना अंगोळकर, संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, माजी अध्यक्ष अभिमन्यु गाडेकर, अजय दूधभाते, अध्यक्ष सचिन सरक,उपाध्यक्ष प्रा.शरद गलांडे, डॉ.अतुल होळकर,कार्याध्यक्ष रमेश गाढवे, सचिव रामेश्वर हराळे ,सहसचिव लक्ष्मण शिंदे,खजिनदार डॉ.दिनेश गाडेकर, सहखजिनदार सूरज गोटके,प्रसिद्धी प्रमुख महादेव मासाळ यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.






