ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेविरोधात सुनेत्रा पवार यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या शब्दावरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र या टीकेवर सुनेत्रा पवार यांनी मात्र अत्यंत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने वापरलेला गुंगी गुडिया हा शब्द अत्यंत चुकीचा…

Read More

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

मुंबई- ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. ‘प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘लगान’मधील प्रदीप रावत यांचे सहकलाकार यशपाल…

Read More

पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे

पुणे- पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. पुणे विमानतळावरील दैनंदिन उड्डाण्णांची कमाल मर्यादा 220 वरून 235 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.  विमानतळावरील गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मोहोळ यांनी 19 मार्च 2025 रोजी भारतीय हवाई दलाकडे स्लॉट वाढवण्याची…

Read More

मिसिंग लिंक परिसराचे फोटो काढायला गेला आणि धाडस अंगाशी आले 

लोणावळा- सध्या सर्वाना बोरघाटातील मिसिंग लिंक मार्गाची भुरळ पडली आहे. प्रत्येकजण या रस्त्यावर आला की रील्स, व्हिडिओ बनवताना दिसतो. हरियाणा मधील एका इसमाला देखील असा मोह झाला आणि घडले भलतेच. मिसिंग लिंक आणि परिसराच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो काढण्यासाठी मोहित स्वरूप भटनागर (वय- ५९, सध्या रा. वांद्रे, मुंबई, मूळ रा. गुरुग्राम, हरियाणा) हे आपल्या आलिशान कारमधून…

Read More

पुणे महापालिका आयुक्तांची खुर्ची जप्त होता होता वाचली.. काय घडले नेमके ?

पुणे- देवाची उरळी आणि फुरसुंगी परिसरातील कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमीनीचा संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी पुणे महापालिकेने अजूनही केलेली नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करा, असे आदेश न्यायालयाने दिले. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेलिफ पोलिसांसह सोमवारी महापालिका मुख्यालयात पोहोचले आणि महापालिकेत आयुक्तांची खुर्ची वाचवण्याची पळापळ झाली….

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९० व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक…

Read More

मावळ गोळीबारात जखमींना पिंपरी महापालिकेत नोकरी देण्याचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे

मावळ गोळीबारातील १३ जखमींना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचा फेरप्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या आंदोलनात झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना महापालिकेने यापूर्वीच कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. मात्र गोळीबारात जखमी झालेल्या १३ जणांना नोकरी देण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आला आहे. पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात…

Read More

दारू मिळणार नाही ! मद्याच्या ‘या’ प्रसिद्ध ब्रॅण्डवर घालण्यात आली बंदी

मुंबई- मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न सुरक्षा नियामक एफएसएसआयने ओल्ड मॉन्क, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मद्यामध्ये नैसर्गिक प्रक्रियेला बगल देऊन कृत्रिम फ्लेवर्स  मिसळल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे…

Read More

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहिल्यास किंवा अशी पाटी लावल्यास होणार कारवाई

पुणे- पोलीस लिहिलेल्या किंवा तशी पाटी लावलेल्या खासगी वाहनांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहेत. ‘पोलीस’ अशा नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनातुन बरेचवेळा अवैध काम व दहशत निर्माण होण्याचा धोका असतो त्यामुळे…

Read More

सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला, खोपोलीच्या के पी धबधब्याच्या दरीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू 

खोपोली- येथील के पी धबधब्यावर वर्षा सहलीसाठी मित्रांबरोबर आलेल्या तरुणाला सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. सेल्फी काढत असताना खडकावरून पाय घसरून धबधब्याच्या दरीमध्ये पडून मृत्युमुखी पडला. अभिषेक कुशवाह (वय 23, रा. ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २) सायंकाळी ठाण्याहून चार मित्र रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळ असलेल्या ‘केपी वॉटरफॉल’…

Read More