ब्रेकिंग न्यूज

काय म्हणताय ? अभिनेता सिद्धार्थ जाधव मृत्यूशी झुंज देतोय ? सत्य जाणून घ्या

Share

मुंबई- अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्याबाबत एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगण्यात आले आहे. ही पोस्ट सिद्धार्थच्या नजरेस पडली आणि त्याने संताप व्यक्त करत केली आहे.. काय म्हणतोय सिद्धार्थ या पोस्टमध्ये ?

सिद्धार्थ याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक युट्यूब चॅनल दाखवतोय. ज्यावर लिहिलं आहे की, ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज… गंभीर आजार…’, ज्यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

सिद्धार्थची पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DcctfyhM2vJ/?igsi=MTk2bGdhbDFuZHQ5cw==

इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ म्हणतोय, “‘नमस्कार मी ठणठणीत बरा आहे…व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग…धिंगाणाचं शूट सुरु आहे.. ज्या ज्या लोकांनी काळजीने msg /call केलेत..त्यांना मनापासून धन्यवाद… बातमीदार जरा मलातरी विचारा.. एवढी कसली घाई आहे तुम्हाला.??? ज्याने Headline /coverage बनवलाय..त्याला तर Nobel द्याच.. Man is a more dangerous Animal than an “ANIMAL”