भटक्या कुत्र्यांसाठी पुणे महापालिका देणार दररोज १०३ रुपये
पुणे- पुणे महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरातील खासगी श्वान निवारा केंद्रांना (डॉग शेल्टर) प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या देखभालीसाठी दररोज १०३ रुपये देणार आहे. शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी पुणे महापालिकेने ऍनिमल वेल्फेअर संस्थांच्या सहकार्याने खासगी शेल्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक…
