बारा पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये बदल्या
पिंपरी- राज्यात सुरू असलेल्या प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध युनिट्समधून बारा पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आलेले पोलीस निरीक्षक खालीलप्रमाणे प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण…
